अजुनी रुसून आहे...  

Posted by यशोधरा in

अजुनी रुसून आहे, खुलतां कळी खुलेना
मिटले तसेच लोचन, कि पाकळी हले ना

समजुत मी करावी, म्हणुनीच तु रुसावे
मी हांस सांगताच, रडताहि तु हसावे
ते आज का नसावे, समजावणी पटेना
धरिला असा अबोला, कि बोल बोलवेना

का भावली मिठाची अश्रूंत होत आहे
विरणार सागरी ह्या, जाणून दूर राहे
चाले अटीतटीने सुटता अढी सुटेना
मिटवील अंतराला, ऐसी मिठी जुटे ना

कि गुढ काहि डाव, वरचा न हा तरंग
घेण्यास खोल ठाव, बघण्यास अंतरंग
रुसवा असा कसा हा ज्या आपले कळेना
अजुनी रुसून आहे, खुलतां कळी खुलेना

-अनिल

This entry was posted on मंगळवार, ११ नोव्हेंबर, २००८ at मंगळवार, नोव्हेंबर ११, २००८ and is filed under . You can follow any responses to this entry through the comments feed .

2 comments

आजच पाहिला हा ब्लॉग. सजावट आवडली.

हे कुमार गंधर्वांचं गाणं वाजू लागलं कानात वाचताना.

१५ नोव्हेंबर, २००८ रोजी ९:१७ AM

सेन मॅन, धन्यवाद. गाण्याबद्दल अगदी! :)

१५ नोव्हेंबर, २००८ रोजी १०:५५ PM

टिप्पणी पोस्ट करा