केतकीच्या बनी तिथे, नाचला गं मोर
गहिंवरला मेघ नभी, सोडला गं धीर
पापणींत साचले, अंतरात रंगले
प्रेमगीत माझिया, मनामनात धुंदले
ओठांवरी भिजला गं, आसावला सूर
भावफूल रात्रीच्या अंतरंगी डोलले
धुक्यातूनी कोणी आज, भावगीत बोलले
डोळियांत पाहिले, कौमुदींत नाचले
स्वप्नरंग स्वप्नीच्या, सुरासुरांत थांबले
झाडावरी दिसला गं, भारला चकोर
-अशोक परांजपे
This entry was posted
on शनिवार, १५ नोव्हेंबर, २००८
at शनिवार, नोव्हेंबर १५, २००८
and is filed under
कविता पानोपानी
. You can follow any responses to this entry through the
comments feed
.