भय इथले संपत नाही...  

Posted by यशोधरा in

भय इथले संपत नाही
मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो
तू मला शिकविली गीते

हे झरे चंद्रसजणांचे
ही धरती भगवी माया
झाडांशी निजलो आपण
झाडांत पुन्हा उगावाया

त्या वेली नाजूक भोळ्या
वारयाला हसवून पळती
क्षितिजांचे तोरण घेऊन
दारावर आली भरती

तो बोल मंद हळवासा
आयुष्य स्पर्शुनी गेला
सीतेच्या वनवासातील
जणू अंगी राघव शेला

देऊळ पलिकडे तरीही
तुज ओंजळ फुटला खांब
थरथरत्या बुबुळापाशी
मी उरला सुरला थेंब

संध्येतील कमल फुलासम
मी नटलो श्रृंगाराने
देहाच्या भवती रिंगण
घालती निळाईत राने

स्तोत्रात इंद्रिये अवघी
गुणगुणती दु:ख कुणाचे
हे सरता संपत नाही
चांदणे तुझ्या स्मरणाचे

ते धुके अवेळी होते
की परतायाची घाई
मेंदूतुन ढळली माझ्या
निष्पर्ण तरुंची राई

-कवि ग्रेस

This entry was posted on मंगळवार, ३० डिसेंबर, २००८ at मंगळवार, डिसेंबर ३०, २००८ and is filed under . You can follow any responses to this entry through the comments feed .

5 comments

भय इथले संपत नाही.... कवी ग्रेस यांच्या या कवितेतील केवळ तीन कडवी मला माहिती होती.. ती ही दुरदर्शन वर एक महाश्वेता नावाच्या सिरियलमध्ये या कडव्यांचा वापर केला असल्यानं मला माहिती होती. आज तुमच्या मुळे मला पूर्ण कविता वाचायला मिळाली. अनेक धन्यवाद!

३० डिसेंबर, २००८ रोजी ५:२९ PM
अनामित  

Aha! My favorite!! :-)

३० डिसेंबर, २००८ रोजी ६:४५ PM

मी सुजित. आपण ब्लॉग छान बनवलायेत. माझं कवी ग्रेस यांच्या कवितांचं कलेक्शन बघा.


http://marathikavitaa.blogspot.com/search/label/%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8

१२ जानेवारी, २००९ रोजी ११:०८ AM

संग्रहातील सा-याच कविता सुंदर आहेत.

२९ जानेवारी, २००९ रोजी १२:०६ AM
अनामित  

kavita khupach chaan aahet...uttam...aani mitranno just try http://dhirajkumardarawdade.blogspot.com and stay connecting for a long time.Have a nice day always...Pratek shan an diwas sukhacha jawo...!

२० फेब्रुवारी, २००९ रोजी १:३६ PM

टिप्पणी पोस्ट करा