नाही पुण्याची मोजणी
नाही पापाची टोचणी
जिणे गंगौघाचे पाणी
कशाचा न लागभाग
कशाचा न पाठलाग
आम्ही हो फुलांचे पराग
आम्हा नाही नाम-रूप
आम्ही आकाश स्वरूप
जसा निळा नळा धूप
पुजेतल्या पानाफुला
मृत्यू सर्वांग सोहळा
धन्य निर्माल्याची कळा
- बा. भ. बोरकर
एकाच वाक्यात बा. भ. यांच्या काव्यप्रतिभेबद्दल बोलायचं? 'दिव्यत्वाची जेथ प्रचिती, तेथे कर माझे जुळती... ' अजून काय?
This entry was posted
on मंगळवार, २१ ऑक्टोबर, २००८
at मंगळवार, ऑक्टोबर २१, २००८
and is filed under
कविता पानोपानी
. You can follow any responses to this entry through the
comments feed
.