पाऊस कधीचा पडतो...  

Posted by यशोधरा in

पाऊस कधीचा पडतो
झाडांची हलती पाने
हलकेच जाग मज आली
दु:खाच्या मंद सुराने

डोळ्यात उतरले पाणी
पाण्यावर डोळे फिरती
रक्ताचा उडला पारा
या नितळ उतरणीवरती

पेटून कशी उजळेना
ही शुभ्र फुलांची ज्वाला
तार्‍यांच्या प्रहरापाशी
पाऊस असा कोसळला

संदिग्ध घरांच्या ओळी
आकाश ढवळतो वारा
माझ्याच किनार्‍यावरती
लाटांचा आज पहारा

-- ग्रेस

This entry was posted on बुधवार, ५ नोव्हेंबर, २००८ at बुधवार, नोव्हेंबर ०५, २००८ and is filed under . You can follow any responses to this entry through the comments feed .

2 comments

फारच छान.

५ नोव्हेंबर, २००८ रोजी ५:१८ म.पू.

धन्यवाद :)

१५ नोव्हेंबर, २००८ रोजी १०:५६ म.उ.

टिप्पणी पोस्ट करा