Posted by यशोधरा

सोन किनारले घन
वन फुलारले ऊन
चित्त मिनारले नभी
स्वर्ग सारांश होऊन

धून निळावली गाढ
नादी सुगंधाचे लाड
प्राणा फुटून पालवी
काया प्रकाशाचे झाड

अष्टभावात गारवा
मंद्र अभोगी मारवा
निवांताच्या घुमटीत
स्वस्थ घुमतो पारवा

-बा. भ. बोरकर

This entry was posted on शनिवार, ५ सप्टेंबर, २००९ at शनिवार, सप्टेंबर ०५, २००९ . You can follow any responses to this entry through the comments feed .

1 comments

दोन्ही कविता सुरेख निवडल्या आहेस. त्यांची शीर्षकंही लिहिशील का?

९ सप्टेंबर, २००९ रोजी १२:०० म.उ.

टिप्पणी पोस्ट करा