सोन किनारले घन
वन फुलारले ऊन
चित्त मिनारले नभी
स्वर्ग सारांश होऊन
धून निळावली गाढ
नादी सुगंधाचे लाड
प्राणा फुटून पालवी
काया प्रकाशाचे झाड
अष्टभावात गारवा
मंद्र अभोगी मारवा
निवांताच्या घुमटीत
स्वस्थ घुमतो पारवा
-बा. भ. बोरकर
This entry was posted
on शनिवार, ५ सप्टेंबर, २००९
at शनिवार, सप्टेंबर ०५, २००९
. You can follow any responses to this entry through the
comments feed
.