Posted by यशोधरा

तळ्याकाठी गाती लाटा,
लाटांमध्ये उभे झाड.
झाडावर धीवराची,
हाले चोच लाल जाड.

शुभ्र छाती, पिंगे पोट,
जसा चाफ़ा यावा फ़ुली.
पंख जणू थंडीमध्ये,
बंडी घाली आमसुली.

जांभळाचे तुझे डोळे,
तुझी बोटे जास्वंदीची.
आणि छोटी अखेरची
पिसे जवस फुलांची.

गड्या पाखरा, तू असा
सारा देखणा रे कसा?
पाण्यावर उडताना,
नको मारू मात्र मासा.


कवितेचं नाव आणि कोणाची आहे ते कोणी सांगेल का कृपया?
धन्यवाद.

This entry was posted on शुक्रवार, २९ जुलै, २०११ at शुक्रवार, जुलै २९, २०११ . You can follow any responses to this entry through the comments feed .

1 comments

१९८८ - ८९ साली मी इयत्ता ४ थीला असताना आम्हाला मराठी च्या पुस्तकामध्ये ही कविता होती. कवितेचं नाव होतं "खंड्या" (धीवर पक्षी).

- पंकज मोहोटकर

२ सप्टेंबर, २०१३ रोजी १०:५२ PM

टिप्पणी पोस्ट करा