मर्ढेकरांची एक कविता  

Posted by यशोधरा in

असे काही तरी व्हावे
अशी दाट होती इच्छा;
असे काही तरी झाले
पुरवितें तेंच पिच्छा

पैलथडी पिके अंबा
ऐलथडी हे शहारे
कुणा भाग्यवंतासाठी
मध्ये वाकतात वारे

ओल्या वाळूंतुन वर
येई रसाळ सुवास;
आणी मनांतील बिया
देती हळूच आळस

असे काहीसे होईल
अशी होती फार आशा;
असे काहीसे झालेले
पाहतांच थिजे भाषा

-बा. सी. मर्ढेकर

*ह्या कवितेचे शीर्षक कोणाला ठाउक असल्यास जरुर कळवावे, धन्यवाद.

This entry was posted on मंगळवार, २१ एप्रिल, २००९ at मंगळवार, एप्रिल २१, २००९ and is filed under . You can follow any responses to this entry through the comments feed .

1 comments

कवितेचं नाव माहीत नाही पण असेकांही असू शकेल. खरंच असं काहीतरी व्हवं असं वाटतं पण ते समोर आल्या नंतर मात्र...........

६ जून, २००९ रोजी १:०९ म.पू.

टिप्पणी पोस्ट करा