असे काही तरी व्हावे
अशी दाट होती इच्छा;
असे काही तरी झाले
पुरवितें तेंच पिच्छा
पैलथडी पिके अंबा
ऐलथडी हे शहारे
कुणा भाग्यवंतासाठी
मध्ये वाकतात वारे
ओल्या वाळूंतुन वर
येई रसाळ सुवास;
आणी मनांतील बिया
देती हळूच आळस
असे काहीसे होईल
अशी होती फार आशा;
असे काहीसे झालेले
पाहतांच थिजे भाषा
-बा. सी. मर्ढेकर
*ह्या कवितेचे शीर्षक कोणाला ठाउक असल्यास जरुर कळवावे, धन्यवाद.
This entry was posted
on मंगळवार, २१ एप्रिल, २००९
at मंगळवार, एप्रिल २१, २००९
and is filed under
कविता पानोपानी
. You can follow any responses to this entry through the
comments feed
.